Press "Enter" to skip to content

गुड न्यूज : लवकरच प्रकल्पग्रस्तांना व महानगरपालिकेतील नागरिकांना मिळणार खुशखबर

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत तसेच पनवेल महानगर पालिकेच्या कराराबाबत या आठवड्यात नगर विकास मंत्री घेणार निर्णय

सिटी बेल | मुंबई |

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांची नुकतीच प्रकल्पग्रस्त बांधवांची गरजेपोटी असलेली घर कायम करण्यासंदर्भात तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करा संदर्भात शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व दि. बा.पाटिल प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बबनदादा पाटिल, शेकापक्षाचे नेते व आमदार बाळाराम पाटिल, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटिल, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत ह्यांनी भेट घेउन चर्चा केली.

यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत आपण याच आठवड्यात एक बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्‍वासन या शिष्टमंडळाला दिले.

नगर विकास मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे गेले कित्येक वर्ष खितपत पडलेला प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न आता निकालात निघेल त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.