सिटी बेल | उलवे |
काल रविवार दि. १५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात खचलेल्या कलाकारांचे मनोबल वाढविण्यासाठी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते हास्यसम्राट जॉनी लिव्हर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा नेरुळ येथील जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का.पाटील, केयर ऑफ नेचर संस्था वेश्वीचे संस्थापक राजू मुंबईकर, पावतु संघटनेचे अध्यक्ष राहुल म्हात्रे,डी. महेश, मुकेश उपाध्ये तसेच इतर मान्यवर व कलाकार व रसिक प्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी विनोदी सिने अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या हस्ते कलाकारांना नेहमीच साथ देणाऱ्या व कोरोना काळात देखील पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या रविंद्र का.पाटील यांचा व राजू मुंबईकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.









Be First to Comment