मंगळागौर
सरली लग्नाची धूम
लेक गेली सासराला
सणावारांचे निमित्त
लेक येते माहेराला
शिव पार्वती ची जोडी
साऱ्या वशेळ्या पुजीती
मंगळागौरीच्या व्रताला
श्रावणात आरंभती
मिळो सौभाग्याचे दान
यथासांग पूजा पाठ
पत्री फुलांनी सजतो
अन्नपूर्णेचा तो पाट
सोळा प्रकारची पाने
औषधांचे गुणधर्म
नवविवाहितेसाठी
आयुर्वेदाचे हे मर्म
पक्वान्नांच्या नैवेद्याने
मौन भोजन प्रारंभ
संयमाच्या शिस्तीतून
होतो संसारी आरंभ
रात्रसारी जागविती
झिम्मा फुगड्या खेळती
थट्टा चेष्टामस्करीने
साऱ्या मुली खिदळती
सासरची माहेराची
दोन्ही घरांची समृद्धी
मंगळागौरीचे व्रत
शुद्ध भावाने साधती
होता पाच वर्षे पूर्ण
वाण आईकडे देते
व्रत उद्यापनातूनी
लेक आशीर्वाद घेते
सौ. स्वाती लेले नवीन पनवेल







Be First to Comment