आला पाऊस
पावसाच्या धारा येती भरा भरा
कोसळती त्या आमच्या मुंबई वरा
कोसळल्या त्या मुसळधारा
नाले नद्या तलाव भरले भराभरा
झाला मुंबईस सर्वत्र पाऊस
झाली रेनकोट, छत्रीची हाऊस
आला काय आणि वाहून गेला काय
शेवटी समुद्रात मिसळला काय
मी म्हणालो पावसा पावसा
बरस तू फक्त शेत आणि तलावात
पुरे आता काही दिवस
सरक आता दुसऱ्या भागात
धर आता पुढची वाट
पुढची लोके पहात आहे तुझी वाट
कर त्यांना पण चिंब चिंब
पडूदे तिकडे इथला प्रतिबिंब
प्रशांत सहस्रबुद्धे, नवीन पनवेल







Be First to Comment