सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
महाविकास आघाडी सरकारमधील बिघाडी कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पुन्हा नाराज झाल्याची माहिती आहे. त्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकार्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने ते संतप्त झाले. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या.मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावरुन चांगलेच घमासान झाले असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती मात्र पालथ्या घड्यावर पाणी !
Be First to Comment