लोकनेते. दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला अखेर आले यश !
उलवे नोड येथे रिलायन्सच्या दोन अद्यावत व्यावसायिक संकुलात सिडको उभारणार अद्यावत कोविड हॉस्पिटल
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तात्काळ मंजूर केले 10 कोटी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल / प्रतिनिधी :
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात झपाटयाने वाढत आहे. सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोड,उरण, पनवेल परिसरात झपाट्याने कोरोनाचा लागण चालु झाली आहे. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटर हि या ठिकाणी नाही जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा हतबल झालेली आहे. रुग्णालयात जागा शिल्लक नाहीत यामुळे अनेक लोक उपचाराविना घरीच थांबून आहेत. खाजगी रुग्णालयात मोठया प्रमाणात लुटमार सुरु असल्याच्या बातम्या प्रसिध्दी माध्यमांत दररोज येत आहेत. त्यामुळे उरण पनवेल उलवे नोड येथील लोकांना तातडीने कोविड हॉस्पिटल ची गरज आहे तसेच त्या हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर , बेड, (ICU)यांची उभारणी करण्याची गरज आहे.जेणेकरून अत्यावश्यक रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल.
या अगोदर सिडको ने मुलुंड येथे 2000 बेड चे व ठाणे येथे 1600 बेड चे अद्यावत असे तात्पुरत्या स्वरुपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडको ने वाऱ्यावर सोडले आहे. सिडको ने मुलुंड, ठाणे या धर्तीवर नवीमुंबई, उलवेनोड, उरण, पनवेल परिसरात हि कोविड हॉस्पिटल उभारावे. या साठी लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सिडको व महाराष्ट्र सरकारला पत्र व्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. आज लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय समितीचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील व समितीचे सचिव कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रातिनिधीक म्हणून सिडको MD ची भेट घेऊन या ठिकाणीची गंभीर परस्थिती सांगितली. व त्यांना संबंधित मागणीचा पत्र देण्यात आला. MD नी तात्काळ या पत्राची दखल घेऊन उलवे नोड येथील से. 7 येथील रिलायन्सच्या दोन अद्यावत व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्यावत कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे व त्या साठी सिडको MD नी तात्काळ 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.व अद्याप मदत लागली तरी सिडको आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहे. असे MD नी आश्वासन दिले आहे.तसेच लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर,खासदार श्रीरंग बारणे , उपाध्यक्ष बबनदादा पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सचिव महेंद्र घरत, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, JNPT विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, समितीचे निमंत्रक अतुल पाटील यांनी या प्रकरणी वेळोवेळी लक्ष व पाठव पुरावा केला. त्यामुळे आज हे यश मिळाले आहे.
सिटी बेल लाइव्ह चा विश्वास ठरला खरा !
सिडकोने पनवेल उरण च्या कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारावे ही मागणी सर्वप्रथम शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच त्यांनी या मागणीचा पाठपुरावा सुरुवातीपासूनच केला होता. बबनदादांनी मागणी केली तर ती पूर्ण होणारचं असा विश्वास त्यावेळी सिटी बेल लाइव्ह ने आपल्या बातमीत व्यक्त केला होता आणि आज तो सार्थ ठरला.
Be First to Comment