Press "Enter" to skip to content

मनमानसी-लेख क्रमांक १०

मनमानसी-लेख क्रमांक १० *अपेक्षापूर्ती...*

या पृथ्वीवर तरी फक्त मनुष्य प्राणीच अपेक्षा घेवूहन जन्माला आलाय, म्हणजे समाजात प्रत्येक कुटुंबातील सदस्य एकमेकांकडून अपेक्षा बाळगूनच जीवन जगत असतात.
अगदी बाळं जन्माला येणार म्हंटले कि घरातील काही सदस्यांच्या अपेक्षा सुरू होतात. मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच..बिचाऱ्या त्या मातेच्या मनाचा, तिला होणाऱ्या त्रास वेदनेकडे कुणाचेच लक्ष नसते. बरं ते मुलं मोठ होत जाते , त्याला कळायला लागले कि , मग आईबाबांनी छान कपडे,भारी खेळणी मस्त खाऊ घ्यावा इतकीच गोड अपेक्षा या बालकांची असते. पण मुले जशी मोठी होतात, तशा अपेक्षा पण मोठ्या होत जातात..म्हणजे बाबांनी मोबाईल , मस्त गाडी घेऊन द्यावी..ही आजकालच्या पिढीची अपेक्षा..! तर मुलांनी प्रत्येक गोष्ट शिकावी, त्यांना सगळेच यावे , ते All rounder असावे ही पालकांची अपेक्षा..!
काही वर्षांनी मुलाचे लग्न झाले कि, सुन नोकरी करणारी..साहजिकच तिच्या सासुबाई कडून अपेक्षा..व सासुबाईंंना सुनेकडून अपेक्षा..असेच अपेक्षा पूर्ण करत करतच आयुष्य पुढे सरकत जाते पण अपेक्षांचे चक्र काही केल्या थांबतच नाही..!
आमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे अशी वयस्कर आईवडिलांची सुन, मुलांकडून अपेक्षा असते..आणि ती योग्य ही आहे..! पण नवरा कामाच्या व्यापात असु दे, नाहीतर ताणात.. नवऱ्याने दरवर्षी आठवणीने वाढदिवस लक्षात ठेवून, छान गिफ्ट आणायलाच पाहिजे अशी बायकोची अपेक्षा..! तर नवीन जोडप्यांचे पण अजून काही वेगळेच..दोघांनीही एकमेकांच्या आवडीनिवडी, मुड सांभाळावे ही अपेक्षा..!
एकुणच प्रत्येक क्षेत्र ते खाजगी असो वा सरकारी तेथे कार्यरत असणाऱ्या नोकरदारांना मेहनत करायची तयारी असतेच..पण बॉसने पगार वाढवून द्यावा, सुट्या व प्रमोशन करावे..अशा त्यांच्या एक ना अनेक अपेक्षा असतातच.
समस्त पालकांची ही अपेक्षापूर्ती व्हायलाच हवी,असे वाटते. ती म्हणजे मुलांनी एक चांगला माणूस व्हावे, उच्च शिक्षण घेवून नाव कमवावे. एवढी माफक अपेक्षा असतेच. मुलेही मग जीव तोडून मेहनत करतात, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अपेक्षापूर्ती करतात. त्यानंतर मग लग्न झाले कि, बायको, मुलांच्या अपेक्षा पूर्ण करतच..अर्धे आयुष्य संपते, पण या अपेक्षा चक्रात मात्र त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा पण पुर्ण व्हाव्यात असे त्यांना कुठेतरी वाटतं असते.पण ते कधीही बोलून दाखवत नाहीत.
समाजातील प्रत्येकजण शेवटपर्यंत अपेक्षांच ओझं सांभाळत जीवन व्यतीत करत असतात.
पण मला असे वाटते की, जर आपण निरपेक्ष आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांचे आयुष्य सुखाचे, समाधानाचे नक्कीच होईल.

सौ.मानसी मंगेश जोशी.
पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.