Press "Enter" to skip to content

शरद पवारांना केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी !

विविध समित्यांच्या नियुक्तीत मराठी खासदारांना झुकतं माप !

विनय सहस्त्रबुद्धे, डाॅ. भगवान कराड, राजीव सातव यांच्यासह उदयन राजेंचीही वर्णी

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #

 संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केलीय. उदयनराजे यांच्याकडे रेल्वे तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचं लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणाकडे कोणती कमिटी :

– शरद पवार : डिफेन्स कमिटी

– विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.

– उदयनराजे भोसले : रेल्वे कमिटी


– प्रियांका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी


– डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी


– ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी


– रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी


– राजीव सातव : डिफेन्स कमिटी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.