पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज आठ जणांचा कोरोना ने मृत्यू
आत्तापर्यंत 135 जणांनी गमावला जीव
171 नव्या रुग्णांची भर 151 जणांना डिस्चार्ज
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत समाधानकारक घट होत असताना दिसत नाही. त्याउलट दररोज होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. आज तब्बल आठ जणांचा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ने बळी घेतला. आज पर्यंत एकट्या महानगरपालिका क्षेत्रात 135 जणांचा कोरोनाने जीव गेला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज एकूण 171 नवे रुग्ण आढळले तर समाधानाची गोष्ट म्हणजे 151 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. येथे सध्या 1391 एव्टिव्ह रूग्ण आहेत.
पहा ही विभागवार आकडेवारी
Be First to Comment