तिसरा पंच
एक गुंड दिवसाढवळ्या एका मुलीचे अपहरण करून नेत असतांना, जमलेल्या गर्दीपैकी कोणीच विरोध केला नाही.
रामायणातील जटायू परत जन्मालाच नाही.
//////
काल पर्यंत एकमेकांच्या धोरणावर सडाडून टीका करणारे, वेगवेगळ्या विचारांचे नेते आज आघाडी करून सोबत व्यासपीठावर जमलेले होते..
बाजूच्या झुडपात रंगबदललेल्या सरड्याने सावज हळूच टिपले
////////////////
कोणामुळे गाडीची गती ठरते? गाडीचे पार्टस आपसांत बोलत होते.. एक्सलेटर आणि क्लच ची युती होती म्हणाले “आम्ही गती ठरवतो” तर टायर्स म्हणत होते “आम्ही गाडी पळवतो, आमच्यावरच गती ठरते”
हे सगळे भांडण ऐकून , गाडीचे ब्रेक मात्र शांत होते..
शेखर अंबेकर, आदई
Be First to Comment