|| श्रीगुरवे नमः ||
नवस
रोज नवी आशा
पूर्ण व्हावी मनीषा
मानवाची देवतेकडे
साकडे घालण्याची भाषा
मनुष्य म्हणे देवा,
अमुक एक दे
मी तमुक करीन
असे वचन देईन
देवाण-घेवाण
ही प्रक्रिया
देवासही न चुके
नवसास पावे स्वार्थाचिये
निष्काम व सकाम
दोन्ही भक्तीचे प्रकार
निष्काम भूषवी संतपद
तर सकाम दावी स्वार्थ
नवस म्हणजे नवीन आस, इच्छा, जी त्या परमेश्वरशक्ती देवतेकडून पूर्ण करवून घेणे. त्यासाठी मग त्या देवतेला अमुक एक काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्यासाठी तमुक एक करीन असे आमिषरुपी वचन दिले जाते. तसेच देवाला साकडे घालणे या प्रकारातही भक्ती आहे. पण ती सकाम, कारण तिथे देवाण-घेवाण हा व्यवहार येतो. जिथे हा व्यवहार संपून ,’ठेविले अनंते तैसेची राहावे | मुखी असू द्यावे हरिनाम’ याप्रमाणे जगण्यास प्रेरित होऊन भक्ताचे अद्वैतभाव जागृत होतात व तिथे अद्वैतभाव निर्माण होणे म्हणजेच याला उच्च कोटीची भक्ती म्हटले जाते. अशा भक्तास मग संतपद प्राप्त होते.
नित्य भक्ती, हरिनाम, परोपकार-परमार्थ;
संत शिरोमणी जाणी केवळ हा अर्थ…
जो मानी सर्वाभूतांठायी परमेश्वर;
जगी तोच खरा अलौकिक संतेश्वर…
✍️ श्वेता जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment