पनवेल / वार्ताहर दि. १२ मार्च
निसर्ग संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या पनवेलच्या निसर्ग मित्र या संस्थेने “२ चाकं ४ देश आणि साठीतलं तारुण्य” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. सहा सायकल स्वार ४ देशांच्यात सायकलवरून भ्रमंती करून आले आहेत. निसर्ग मित्र या संस्थेने रविवारी सायंकाळी त्या सहा सायकल स्वारांसोबत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच या संस्थेच्या वतीने त्या सहाही सायकलवीरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पनवेलच्या सहा सायकल स्वारांनी तब्बल ३८५० किलोमीटर प्रवास करून थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम या देशांना भेटी दिल्या होत्या. त्यांच्या प्रवासातील किस्से आणि गमती जमती ऐकण्यासाठी निसर्गमित्र या संस्थेने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात एका जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी चार ते सात या दरम्यान पार पडणार आहे.
या अनोख्या सायकल राईड व त्या राईड मधील अद्भुत किस्से आणि गमती जमती ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन निसर्ग मित्र या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास विशाल पाटील 9029119182, आशिष ठाकूर 9833000393, साक्षी चव्हाण 7977098821 यांच्याशी संपर्क साधण्याचे निसर्ग मित्र संस्थेने आवाहन केले आहे.





Be First to Comment