९३ वरून वाढून साप्ताहिक उड्डाणं होणार ४०६
नवी मुंबई / वार्ताहर
उन्हाळी हंगामाच्या शुभारंभाला इंडिगो एअरलाइन्सने नवी मुंबई विमानतळावरून सेवा विस्तारण्याची योजना आखली आहे. तूर्तास नवी मुंबई विमानतळावरून १३ मार्गांवर विमान सेवा उपलब्ध आहे. ही विमान सेवा तब्बल ४६ मार्गांपर्यंत विस्तारण्याचे एअरलाईन कंपनीचे नियोजन आहे.
नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण सेवा वाढवत असतानाच मुंबई विमानतळावरून मात्र इंडिगो ५८ मार्गांवरील सेवा कमी करून ४६ मार्गांवरती आणणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे बदल होण्याची अपेक्षा आहे.
इंडिगो एअरलाइन्सचा नवी मुंबई विमानतळावरील मार्ग विस्तार खालील प्रमाणे असणार आहे…
१) नवी मुंबई ते छत्रपती संभाजीनगर (दररोज १)
२) नवी मुंबई ते बागडोगरा ( दररोज १)
३) नवी मुंबई ते बेळगाव (दररोज १, एटीआर विमानसेवा )
४) नवी मुंबई ते भावनगर ( दररोज २ एटीआर विमानसेवा)
५) नवी मुंबई ते भोपाळ (दररोज १)
६) नवी मुंबई ते चंदीगड (दररोज १)
७) नवी मुंबई ते देहरादून ( आठवड्यातून पाच वेळा )
८) नवी मुंबई ते दिव (दररोज १, एटीआर विमानसेवा )
९) नवी मुंबई ते गोवा दाबोलीम ( दररोज १)
१०) नवी मुंबई ते गोरखपुर ( दररोज १)
११) नवी मुंबई ते हिरासर (दररोज १, एटीआर विमानसेवा )
१२) नवी मुंबई ते हुबळी ( दररोज १)
१३) नवी मुंबई ते इंदोर ( दररोज२)
१४) नवी मुंबई ते जामनगर ( दररोज १)
१५) मुंबई ते कन्नूर ( आठवड्यातून तीन वेळा )
१६) नवी मुंबई ते कोल्हापूर (दररोज २, एटीआर विमानसेवा )
१७) नवी मुंबई ते कोलकाता ( दररोज १)
१८) नवी मुंबई ते पटना ( दररोज १)
१९) नवी मुंबई ते रायपूर ( दररोज १)
२०) नवी मुंबई ते श्रीनगर (आठवड्यातून पाच वेळा)
२१) नवी मुंबई ते तिरुवनंतपुरम ( दररोज १)
२२) नवी मुंबई ते वाराणसी ( दररोज १)
मुंबई विमानतळावरील पुढील सेवा नवी मुंबई विमानतळावर हलविण्यात आल्या आहेत.
१) नवी मुंबई ते अयोध्या ( दररोज १)
२) नवी मुंबई ते बरेली (आठवड्यातून चार वेळा )





Be First to Comment