तिसरा पंच-भाग क्र. ६ *शर्यत*
खूप वर्षांपूर्वी एका जंगलात ससा आणि कासव मित्र होते.. दोघे एकमेकांना अगदी लहान असल्यापासून ओळखत होते.. दोघांचीही घरे जवळ जवळ होती..आता दोघे तरुण झाले होते.. ससा कसा पंधरा शुभ्र, कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसत असे.. जरी तो दाखवत नसला तरी त्याला बघून कासवाला मनातून ईर्षा होत असे.. त्यात सश्या चा धावण्याचा वेग कासवाला अजून दुःखी करत असे..
एके दिवशी कासव रस्त्याने घराकडे जात होते.. ससा त्याच्या बाजूने वेगाने पुढे गेला.. त्याला हरवायचेच ह्या विचाराने कासव दृढतेने चालू लागले.. थोडे दूर गेल्यावर सशाने बागेतली गाजरे खाल्ली, तळ्यातले थंड पाणी प्यायला, झाडाखाली मस्त डुलकी देखील काढली.. कासवाने त्याला हे करतांना पाहून ह्या सगळ्याला दुर्लक्षून मन मारत चालत राहिले सशाला हरविण्यासाठी.. शेवटी कासव एकदाचे डोंगरावर असलेल्या घरापर्यंत पोहचले.. थोड्या वेळाने ससा तिथे पोहचला त्याच्याकडे पाहत कासव म्हणाले
“मी जिंकलो, मी जिंकलो”
ससा म्हणाला
” अरे कासवा, शर्यत लावलीच कुणी होती? आपण दोघेही त्याच रस्त्यावरून आलो बघ, आणि मी तर रस्ता भर मज्जा करत आलोय, तू काय केलेस?”
शेखर अंबेकर, आदई, पनवेल







Be First to Comment