तिसरा पंच- भाग क्र. ५ *सुंदर मूर्ती*
एका गावात एक मुर्तीकार राहत होता.. पूर्ण पंचक्रोशीत त्याच्या मूर्तींची चर्चा होत असे. आता वयस्कर होत असल्याने मूर्ती बनविणे त्याला शक्य होत नव्हते.. त्याच्या मुलाला त्याने मूर्तिकार होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे त्याने ठरविले.. त्याचा मुलगा नुकताच प्राथमिक शिक्षण आटोपून शहरामधून गावामध्ये परत आला होता. तो मात्र ह्या कामाला हलके समजत असे.. त्याला शहरात राहून पांढरपेशा नोकरी करण्याची इच्छा होती आणि
एक गोष्ट मात्र घडली होती त्याला शहरामध्ये राहून काही वाईट सवयी लागल्या होत्या.. त्यामुळे तो अधिक उद्धट आणि रागीट झाला होता.
मुलाच्या अश्या वागण्यामुळे तो मूर्तीकार अधिक अधिक नाराज राहू लागला.
एके दिवशी तो मूर्ती बनवीत असतांना त्याचा मुलगा तिथे आला आणि त्या मूर्तीकडे नवलाने पाहत होता..
अत्यंत सुंदर देवतेची ती मूर्ती पाहून तो आश्चर्यचकित झाला.. त्याने विचारले
” बाबा, ह्या दगडातून ही मूर्ती झाली असे वाटत नाही..”
वडिलांनी हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले
” बेटा, मूर्ती ह्या दगडात पाहिले पासून होती.. मी काय केले तर अनावश्यक दगड फक्त काढून टाकला!!”
मुलाला ही त्याची चूक कळली तो म्हणाला
” बाबा, मी देखील माझ्या वाईट सवयी सोडून देईल आणि चांगला व्यक्ती होईल”
तेंव्हा मुर्तीकाराने ओठाजवळ असलेला दगड त्यांच्या छंनी ने उडविला.. त्यामुळे ती मूर्ती हसू लागली..
शेखर अंबेकर, आदई







Be First to Comment