Press "Enter" to skip to content

शब्द संगीत क्र. – २

शब्द संगीत क्र. – २ *आपले योगशास्र*

आपल्या भारतीय संस्कृतींचे हे वैशिष्ट्य आहे की आध्यात्मा सारखा अवघड विषय ग्रंथाच्या माध्यमातून गाठीसारखा सोडवून संवादाने सामान्य जनांपर्यंत पोहोचवला आहे . त्यापैकीच योगशास्रातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे आपला अष्टांगयोग..!

पूज्य . पतंजली मुनींनी योगसुत्रांच्या सुरूवातीलाच म्हंटले आहे ,
‘ योगश्चित्तवृत्ती निरोधः’
म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे हा योगाचा मूळ हेतू.
दैनंदिन जीवनात माणसाचा कल भौतिक सुखाकडे असतो .
नोकरी , व्यवसाय , संसार यामधून सुखी  जीवनाच्या दिशेनं वाटचाल सुरू असते.
या मार्गात संकटे , अडचणी , आजारपण , अपयश , असमाधान , चिंता , बेचैनी, भावनिक दुःख इ. अनेक अडथळे असतात . हे अडथळे पार करत सुखाचा शोध घेणारा माणूस कळत नकळत आध्यात्माकडे वळतो.
प्रपंच करावा नेटका असे सांगणारे आध्यात्म माणसाची आदर्श जीवन पद्धती कशी असावी , याचाही  मार्ग सांगते.

पातंजल योगसुत्रामध्ये साधनेच्या आठ पायऱ्या सांगितल्या आहेत .

यम नियम मनाला शिस्त लावून चित्तशुद्धी करणे .
या नियमां मधील सत्य , अस्तेय, अपरिग्रह , इ. गोष्टी जीवनाला शिस्त लावतात .
आसन – प्राणायाम  शरीराला शिस्त लावून देहशुद्धी करतात. आसनांमुळे शरीर तंदरुस्त रहायला मदत होते .
शरीराचे वजन संतुलित राहाते .

प्राणायायमामुळे नाडीशुद्धी होते , रोगप्रतिकारक शक्ती वाढते . शरीर आरोग्यसंपन्न होते .

मनामध्ये षडविकार आणि विविध प्रकारचे स्वार्थी क्षुद्र विचार यांचे प्राबल्य असते .
सुखाकडे ओढ घेणाऱ्या या मनाला संयमाच्या सहाय्याने रोखून धरावे लागते. यामुळे विचारशुद्धी होते  यालाच प्रत्याहार म्हणतात .
धारणा  , ध्यान , समाधी , चित्त एकाग्रतेमुळे मनातील विषमता जाऊन बुद्धीची समावस्था निर्माण होते त्यामुळे आयुष्याची हेतू शुद्धी होते .

योग  साधनेचे हे आठ सोपान मानवाच्या सर्वांगीण शुद्धीचा उत्कृष्ट आराखडा आहे .

आपल्या पूर्वजांचे हे Washing machine ( पतंजली अष्टांगयोग ) सर्व सामान्य समज आहे  ,
त्यापेक्षा किती तरी व्यापक आणि किती तरी सर्वंकष
आहे .
सकाळी उठून रात्री झोपे पर्यंत मनुष्याची देह , मन , बुद्धी , आत्मा या चारही अंगाना सक्षम , स्थिर , सतेज आणि सत्प्रवृत्त ठेवण्याचं काम हा अष्टांगयोग करतो.
अष्टांगयोगाचा अभ्यास सुरू झाला की, लक्षात येते की ,योग म्हणजे केवळ शारीरिक आसन नव्हे .
फक्त श्वासोच्छवासांचे प्रकार नव्हेत .
अष्टांगयोग म्हणजे जीवन दर्शन आहे .
भगवंताच्या  “युक्ताहारविहारस्य ” या वचनाशी एकंदरीतच ध्यानयोगाशी सुसंगत राजयोग , ज्ञानयोग , भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा सुरेख मेळ.
आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ,
आदर्श जीवनाच्या  ‘ standard operating process ‘ म्हणजेच अष्टांगयोग.
मनुष्याला आतून बाहेरून धुवून नवसंजीवनी देणारं असं हे दैवी ‘Washing machine’ .
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्याचं आठ सायकल्स युक्त ( यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान आणि समाधी )  ‘daily Washing machine ‘  ‘life time warranty ‘ सह आणि पतंजली योगसुत्राच्या ‘ user manual ‘ सकट संपूर्णपणे फुकट विनामूल्य असं डील तर अगदी ‘online ‘ पण मिळणार नाही .
तेव्हा त्वरा करा आणि आजच आपल्या आयुष्यात   भारतीय   ऋषीमुनींचं जगभराला , आपणा सर्वाना दैवी देणं असलेलं Washing machine आपल्या कुटूंबात  आणून आपलं मनुष्यरुपी वस्र दररोज स्वच्छ ठेवायला सुरूवात करूयात.
कुणी सांगावं ‘ या  मशीन मधून स्वच्छ झालेलं आपलं वस्र टाकून द्यायची जेव्हा वेळ येईल त्या वेळेला ते वस्र
जीर्णही झालेलं नसेल कदाचित.

भगवंत ,  अर्जुनास म्हणतात

टाकिसे जसे तू वस्र जुने झालेले
आत्मा ही त्यजतो शरीर जीर्ण शीणलेले ||
त्याहून अर्थ नसे अधिक शरीराचा
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ||

संगीता थोरात, नवीन पनवेल .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.