प्रेम
मज वेड का तुझे हे लागून राहिलेले
वेडे अबोल धागे लागून राहिलेले
धागे अबोल वेडे गुंफून मी मनात
स्वप्नात स्वप्न वेडे बहरून राहिलेले
स्वप्नात स्वप्न वेडे गुंगून पाहिले अन्
जागेपणात अधुरे होऊन राहिलेले
जागेपणात अधूरे राहील स्वप्न जरिही
नाते तुझे नि माझे उमलून राहिलेले
उमले हळूच नाते आता तुझे नि माझे
निस्तब्ध घोर तिमिरी उजळून राहिलेले
उजळून होत जाई “अनिरुद्ध” प्रेम अपुले
अस्तित्व वादळी ही टिकवून राहिलेले
अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment