Press "Enter" to skip to content

महाडच्या क्रांतीभूमीतून शिक्षण हक्क पदयात्रेला सुरुवात ; अंगणवाडी ते उच्चशिक्षणापर्यंत सर्वसामान्य मुलांना शिक्षण मोफत मिळावे- संदीप रेणुका पाटील

पेण, ता. 26 (वार्ताहर) : केंद्रासह राज्य सरकारने शिक्षणाचा बोजबारा उडवला असताना आजवर अनेक शासकीय शाळा बंद पडून खाजगी शाळांना प्राधान्य दिले जात असल्याने शिक्षण क्षेत्राच्या या खाजगीकरणा विरोधात सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांच्या माध्यमातून आज दि. 26 सप्टेंबर रोजी महाडच्या क्रांतीभूमीतून शिक्षण हक्क यात्रेला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोंबर रोजी आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मभूमीत पेण गागोदे येथे सांगता होणार आहे.

त्यामुळे शासनाने अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वसामान्य मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावी अशी मागणी या यात्रेच्याद्वारे करण्यात आली आहे. केंद्रासह राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणाची लयलूट करत पहिलीच्या प्रवेशासाठी 40 हजार, अकरावी- बारावी 2 ते 3 लाख, इंजिनिअरिंगसाठी 15 ते 17 लाख तर डॉक्टर होण्यासाठी 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागत असल्याने या वाढत्या शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणात सर्वसामान्य तसेच गोरगरीब, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून आता वंचितच राहावे लागत आहे.त्यातच शासनाने सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना प्राधान्य दिल्या कारणामुळे नीती आयोगाच्या अहवालानुसार देशभरात 92 हजार सरकारी शाळा बंद करण्यात आल्या असताना महाराष्ट्रातील 10 ते 12 हजार आणि रायगड जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त शाळांचा समावेश आहे.त्यामुळे सरकारी सर्व शाळा वाचाव्यात आणि शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण बंद व्हावे अशी मागणी या यात्रेद्वारे सत्यशोधक सर्वोदय संघटनाचे संदीप रेणुका पाटील आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे आयोजक शरद जावडेकर यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.