Press "Enter" to skip to content

भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित यांच्या वतीने वर्षावास मालिकेचे आयोजन

डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत रायगड समाजरत्न सन्मान पुरस्काराचे वितरण सोहळा

पेण, ता. २५ (वार्ताहर) : भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अंतर्गत पेण शाखा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता पेण शहरातील लोकमान्य हाउसिंग सोसायटी गार्डन हॉल येथे वर्षावास मालिकेच्या 14 व्या पुष्पाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे चीफ डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते रायगड समाजरत्न सन्मान पुरस्काराचे वितरण सोहळा होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बहुजन महासभेचे कार्य संपूर्ण देशभर सुरू असून या संस्थेच्या माध्यमातून आजवर विविध उपक्रमाद्वारे धार्मिक शिबिरे लावण्यात येत असताना आषाढ ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यातील वर्षावास मालिका सर्वत्र संप्नन्न होत असताना भा.बौ.महासभेचे पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आणि वंचितचे पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांच्या पुढाकाराने धम्म प्रवचनाचे 14 वे पुष्प आणि रायगड समाजरत्न सन्मान पुरस्काराचे वितरण सोहळा पेण शहरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी गार्डन हॉल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू
डॉ.भिमराव आंबेडकर यांच्यासह केंद्रिय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्राचे अध्यक्ष यु.जी.बोराडे, संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे, उषाताई कांबळे आदि उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पेण तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत सोनवणे आणि सुनील धामणकर यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.