Press "Enter" to skip to content

सोसायटी पुनर्विकास विषयावर ऍडव्होकेट सचिन कल्याणकर यांचे व्याख्यान

पनवेल/ प्रतिनिधी.
मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्बांधणी बाबत अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पनवेल येथील सुप्रसिद्ध विधीतज्ञ तथा पुनर्विकास मार्गदर्शन निष्णात सचिन कल्याणकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर व्याख्यान ऑनलाइन माध्यमातून संपन्न होणार आहे.

आयोजकांच्या वतीने दर शुक्रवारी विविध विषयांवर मार्गदर्शन करणारी व्याख्याने आयोजित केली जातात. यात प्रामुख्याने गृहनिर्माण संकुलांच्या पुनर्विकास संबंधित मुद्द्यांना प्राधान्य दिले जाते. शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रमुख वक्ते एडवोकेट सचिन कल्याणकर हे पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सेवा प्रधान विरुद्ध उपलब्ध कायदेशीर उपाय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालक सुनील शर्मा या कार्यक्रमाचे मॉडरेटर असतील.
मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड यांच्यावतीने आयोजित झूम मीटिंगचा आयडी क्रमांक 7450427870 असून पासकोड 54321 आहे.खालील लिंक च्या माध्यमातून देखील या व्याख्यानामध्ये सहभागी होता येईल.
https://us02web.zoom.us/j/7450427870?pwd=kOTUoEKTKCTg4bKNJ8c3aflKnotN8T.1&omn=84330138316&mynotes=on

सोसायटी पुनर्विकास हा सदनिका धारकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केल्याने अनेक रहिवाशांना त्याचा फायदा होईल. एडवोकेट सचिन कल्याणकर हे या विषयातील तज्ञ असून तूर्तास विविध गृहनिर्माण संकुलांच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून ते अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.