
नागोठणे प्रतिनिधी : याकुब सय्यद
सविस्तर वृत्त असे की नागोठणे अंबा नदीतून लालसर रंगाचा माती मिश्रित दृश्चित पाणी वाहत असून दिनांक 23 सप्टेंबर बुधवार रोजी नागरिकांच्या निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे खरे तर आंबा नदीतून लालसर रंगाचा माती मिश्रित दूषित पाणी केटी बंदरातून जलवाहिनीद्वारे लोकांच्या घरापर्यंत पुरविला जात आहे त्याचे मुख्य कारण काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केटी बंधारा जलवाहिनीतून हेच पाणी गावातील नागरिकांन पर्यंत पुरवला जात आहे.
केटी बंधारा जलवाहिनीतून लालसर रंगाचा माती मिश्रित दूषित पाणी नागरिकांना पाणीपुरवठा नळातून पुरवला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे दृष्टीत पाणी पिणे फार दूरचे त्या दूषित पाण्याने अंघोळ करणे कपडे धुणे देखील करता येणार नाही एवढ्या घाणेरड्या गढूळ स्वरूपाचा पिण्याचा पाणी सध्या नागोठणे शहर व इतर परिसरात केटी बंधारा जलवाहिनीतून नागोठणेतील नागरिकांना पुरवला जात आहे त्यामुळे नागोठणेकरांचे खूप प्रचंड हाल झाले आहेत.
काही दिवसापासून नागोठणेतील नागरिकांना तसेच खास करून लहान मुलांना थंडीताप कावीळ सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात आता सध्या अंबा नदीतील तसेच केटी बंधारा जलवाहिनीतून लालसर रंगाचा माती मिश्रित दूषित पाणी पुरवला जात असल्याने नागरिकांमध्ये आणखीन भीतीचे वातावरण पसरले आहे.
असे किती दिवस दूषित पाणी नागरिकांना पिण्यास भाग पाडणार आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे तसेच नागरिकांमध्ये चिंता संताप वाढला आहे नागोठणे शहर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी स्वच्छ पाणीपुरवठा प्रशासनाने जलद गतीने पिण्याचा पाणी स्वच्छ करून नागरिकांना भेडसावत असलेला ह्या गंभीर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर करून पुढे शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना करावा अशी नागोठणेतील जनतेतून जोरदार मागणी होत आहे.



Be First to Comment