Press "Enter" to skip to content

युवा नेते ललित पाटील यांच्यामुळे पेण- कासमाळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात : आ.रवीशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून रस्त्याचे काम सुरू पर्यटनाला चालना मिळणार

पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण शहरापासून अवघ्या ४ किमी अंतरावर असणाऱ्या बोरगाव कासमाळ व पुढील आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या पेण- कासमाळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला भाजपचे युवा नेते ललित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरुवात झाली असून याकरिता आमदार रवीशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून हे काम सुरू झाल्याने येथील असणाऱ्या कासमाळ या पर्यटन स्थळाला अधिकची चालना मिळणार आहे.

२०१६ ते २०१८ यादरम्यान मुख्यमंत्री ग्रामसड़क योजनेतून पेण ते धनगरमाळ हा ६.१२० किमी लांबीचा रस्ता के.टी. कंस्ट्रक्शन कंपनीने निकृष्ठ दर्जाचा केल्याने जागोजागी खड्डे पडलेले होते. त्यामुळे या भागातून येणाऱ्या हजारो नागरिकांसह शाळेय विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.त्यामुळे सदरच्या रस्त्याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने अखेर भाजप युवा नेते ललित पाटील यांनी याची दखल घेत आमदार रवीशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून दुसऱ्या टप्प्यातील २ किमीच्या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ८० लाखाच्या निधीद्वारे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली असल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पेण बोरगाव कासमाळ हे पर्यटन स्थळ झाले असून येथील हिरवेगार पठार आणि वेगवेगळ्या फुलांनी नटलेला निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना भुरळ पाडत आहे हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी स्थानिकांसह मुंबई, ठाणे, पुणे येथून पर्यटक कायम येत असतात मात्र काही महिन्यांपासून येथील रस्त्याची बिकट अवस्था झाली होती.येथील ग्रामस्थांना ये- जा करणे कठीण झाले होते त्यामुळे स्थानिकांच्या मागणीला अनुसरून येथील दत्त मंदिर ते कॅनल रोड पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू केले असून लवकरच कॅनल रोड ते कासमाळ या टप्पातील पण काम पूर्ण करणार आहोत.सदरच्या काँक्रिटीकरण रस्त्यामुळे येथील गावांसह जवळपास पंधरा- सोळा आदिवासी वाड्या आता थेट शहराशी जोडणार आहेत.
— ललित पाटील- युवा नेते भाजप

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.