Press "Enter" to skip to content

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी)  भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक आणि प्रखर राष्ट्रचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.       

यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यात आले. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता. भारतीय संस्कृती, समाजव्यवस्था आणि राष्ट्रजीवनाचा सखोल अभ्यास करताना त्यांनी शास्त्रे, धर्मग्रंथ तसेच विविध तात्त्विक ग्रंथांचे चिंतन व मनन केले. त्यातून त्यांनी ‘एकात्म मानववाद’ हा विचार मांडला. 

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत, तसेच राष्ट्रजीवनात भारतीय मूल्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, या विचारांना त्यांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केले. राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय विचारपरंपरेप्रती त्यांची निष्ठा त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा आजही कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून, त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.