Press "Enter" to skip to content

चिरनेर जंगल सत्याग्रह दिनानिमित्त अंकुर ट्रस्टतर्फे हुतात्म्यांना अभिवादन

शासनाने आदिवासी समाजाला वेठबिगाराच्या जोखडातून मुक्त करावे- सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील

पेण, ता. २५ (वार्ताहर) : चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आजही या समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या उद्भवल्या असल्याने शासनाने यातून आदिवासी समाजाला वेठबिगारीच्या जोखडातून पूर्णपणे मुक्त करावे तरच ही खरी श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व अंकुर ट्रस्टच्या संचालक डॉ.वैशाली पाटील यांनी केले.

चिरनेर जंगल सत्याग्रह हा रायगडच्या तसेच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय असून २५ सप्टेंबर १९३० रोजी ब्रिटिशांच्या वनकायद्याविरोधात चिरनेर परिसरात आदिवासी व स्थानिक जनतेने जंगलावरील आपला पारंपरिक हक्क मांडत सत्याग्रह केला होता.या आंदोलनात नाग्या महादू कातकरी यांच्यासह अनेकांनी बलिदान देऊन आपला जंगल, जमीन आणि जगण्याच्या अधिकार शाबूत ठेवला त्या लढ्याची कातकरी समाजाला आजही प्रेरणा आहे.चिरनेरच्या हुतात्मा स्मारकावर कातकरी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू यांचे नाव कोरले जावे अशी मागणी करून कातकरी समाजाची स्वतंत्र सामाजिक ओळख आणि इतिहास सार्वजनिक स्मृतीत आणण्याचे काम अंकुर ट्रस्टने सुरुवातीच्या काळात केले.त्यातून कातकरी समाजाच्या इतिहास, अस्मिता आणि हक्कांच्या प्रश्नांना व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप मिळण्यास सुरुवात झाली.आज ही चळवळ अधिक व्यापक झाली असल्याने कातकरी समाजाच्या वनहक्क, जमीनहक्क, स्थलांतर आणि वेठबिगारीमुक्तीच्या प्रश्नांवर विविध स्तरांवर काम सुरू आहे.

या सत्याग्रह दिनानिमित्त अंकुर ट्रस्टच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात अंकुर ट्रस्टच्या कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्य नीरा वीर यांच्या नेतृत्वाखाली रघुनाथ पवार, बाळाराम नाईक, एकनाथ नाईक, शंकर नाईक आणि योगेश नाईक, समिर वाघमारे आदिंनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.