कर्तव्य की ममता
प्रश्न खूप गंभीर,
कर्तव्य श्रेष्ठ की ममता ??
उत्तर मार्मिक असे,
त्यावेळी असेल ज्याची महानता…
जेव्हा तुम्ही देशकार्यासाठी
मनापासून झटता..
नेहमीच त्या कर्तव्यासाठी
ऋणी राहते जनता…
आवश्यक स्थितीला मनातून
नाही चालत हरून…
काम मात्र करावंच लागतं
अगदी तहान भूक विसरून…
मोबदला तर मिळत असतो
अश्या कामासाठी…
कधी पगार, विलक्षण समाधान
तर कधी लोकांचं प्रेम असतं त्यापाठी…
जेव्हा नसेल देशाला गरज
नसेल कसलीचं आणीबाणी…
तेव्हा विचारतं का कुणी,
असतो तेव्हा आपल्या सुखाचे राजाराणी…
जेव्हा असेल सगळं सुरळीत
नसेल कसल्या संकटाचं अस्तित्व…
तेव्हा ते देतातच की
कर्तव्यापेक्षा ममतेला महत्त्व !!
ह्या कोरोनाच्या परिस्थितीत
ते मदत करतायत आपापलं कर्तव्य करून !!
आपणही करू देशकार्य
मात्र घरातच बसून…
पोलीस, डॉक्टर्स, सगळे कर्मचारी
झटतायत देशासाठी सोडून आपलं घरदार…
मग आपला हक्क नक्कीच बनतो
मानुया त्यांचे मनापासून आभार !!
शार्दूल दामले, कुडाळ.







Be First to Comment