राधा आणि मीरा
तुझ्या बासरीच्या आवाजाने
माझे मन विचलित झाले
मी राधा अन मी मीरा
तुझ्या प्रेमात बेधुंद झाले.
राधा होउनी तुझ्या मनात,
मी वास करते,
मीरा म्हणूनी तुझ्या भक्तीत
मी वाहून जाते.
राधाही म्हणते तु माझा श्याम…
मीरा म्हणते तु माझा गोपाल..
दोघांचे प्रेम एक व्यक्तीवर…
दोघी पूजिती काळा श्यामवर.
एक आहे राजकुमारी
आणि दुसरी प्रेम विरहिणी..
पण दोघांच्या प्रेमात भक्ती असते…
विरहिणी म्हणून तर जगात मानते.
अपराजिता माधव घांगुर्डे, खांदा कॉलनी







Be First to Comment