तिसरा पंच-भाग ४ *मनःशांती*
एकदा एका तरुण संन्यासी शांती च्या शोधात निघाला. अनेक गुरूंची भेट घेत त्याने त्यांचे मार्गदर्शन घेतले. अनेक विद्वानांशी चर्चा विमर्श, वादविवादात भाग घेऊन उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला. जसे जसे दिवस जात होते तो अधिकाधिक निराश होत जात होता. तेंव्हा एकाने त्याला गुरू आदित्यनाथांचे नाव सांगितले . तो त्यांच्या कडे गेला आणि त्याने त्यांना शांती चा मार्ग विचारला.. गुरूंनी त्याच्याकडे हसून पाहिले आणि त्याला सांगितले की साधना हाच मनःशांती मिळविण्याचा उपाय आहे. तू इथे रहा आणि साधना कर. त्याने त्या आश्रमात मुक्काम ठेवला. तो रोज उठून आश्रमातील सर्व कामे करत असे आणि साधना करत असे. दिवसामागून दिवस गेले पण तो यशस्वी झाला नाही. एकेदिवशी अत्यंत निराश मनाने त्याने आश्रम सोडला आणि रानोमाळ भटकू लागला. शेवटी थकून एका झाडाखाली थांबला.. आणि शांत बसला, किती वेळ निघून गेला त्याला ही कळले नाही.
एकदम त्याच्यावर झाडावरून फुलांचा वर्षाव होऊ लागला.. कुठूनतरी आवाज आला तुझी साधना यशस्वी झाली.
तो म्हणाला पण मी काही बोललोच नाही, तेव्हा झाड म्हणाले
तू काही बोलला नाहीस आणि आम्ही काही ऐकले नाही त्यामुळेच ती यशस्वी झाली..🙏🏻
शेखर अंबेकर, आदई







Be First to Comment