Press "Enter" to skip to content

पाठवणी

पाठवणी

लेक जाता सासराला
जीव लागे टांगणीला
आत लवते प्राण ज्योती
लेक माझी लाडकी ती

स्वप्न पूर्तीच्या क्षणीही
कोणती हुरहुर उरी ही ?
मोकळे आभाळ व्हावे
का मनाला आवरावे ?

खेळ भांडी काल चार
खेळली नुकतीच पोर
गाठले मोठेपणाने
साधले हे मांडवाने

सांगते सुख मंत्र, बाळ
जोड घरच्यांशी ग नाळ
चार भिंतींचे नसावे
घर जिव्हाळ्याचे असावे

विहिण बाईना विनंती
अजुनही ओलीच माती
खास निगराणी करावी
नीव नात्याची भरावी

दृढ व्हावे गोड नाते
हे जसे ओवी नि जाते
साथ प्रेमाची मिळावी
वेल वंशाची फुलावी

निलिमा देशपांडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.