॥ श्री गुरवे नमः॥
विचारधारा-१० *गरज*
गरज माणसाला जगायला शिकवते. मूलभूत गरजा सोडल्या तर इतर गरजा या काळाच्या ओघात वाहणाऱ्या असतात.
आपण म्हणतो की, गरज संपेस्तोवर प्रयत्न करीत राहणे. हीच गरज पुढे वाढत गेली की तिचे लालसेत रूपांतर होते. म्हणून तर अंथरूण पाहून पाय पसरावेत असे म्हटले जाते.
आता काळाच्या गरजेनुसार व आपल्या कुवतीनुसार काय हवे असणे आवश्यक आहे तेवढे पहावे.
मुक्या प्राण्यांवर दया दाखवून त्यांना खायला देणे हे ठीक, पण त्याआधी घरातील वा गरीबाच्या मुखी दोन घास देणे हे अधिक योग्य. कारण कोणताही प्राणी हा शरीराने दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून किंबहुना तो उदरनिर्वाह चालवतोच. पण माणसाला मात्र इथे बुद्धीचाही वापर करावा लागतो हा फरक आहे.
गरज गरज गरज;
तिन्ही काळांची गरज;
मर्यादेत असावी ही गरज;
अन्यथा लालसारूप घेई ही सहज…
गरजेपुरती एखाद्याला मदत करणे हेच योग्य पण त्याच्या त्या गरजेचा गैरफायदा घेऊन त्याला अधिक लोभाचे आमिष दाखवून फसवणूक करणे हा अपराध आहे.
माणसाने माणुसकीला जागावे;
गरजेपुरती मर्यादित असे जगावे…
✍️लेखिका✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment