Press "Enter" to skip to content

नवं आभाळ

नवं आभाळ

उंच भरारी मारणारा पक्षी लोकांच्या डोळ्यांत खुपतो,

कोणी असुरी ईर्श्येने त्याचे पंख छाटावयास धावतो!!

कधी उपहास, कधी टोमणे, कधी कुत्सित नजरा,
त्याला खाली पाडायच्या विचारात वेळ जातो सारा!!

पक्षी आपल्या लक्ष्यावर खिळवून आहे त्याची नजर,
फालतू, निरर्थक गोष्टींना त्याच्या लेखी नाही कदर!!

परिश्रम अन् ध्येयासक्तीचं आहे त्याच्या पंखात बळ,
नक्कीच गाठणार नवं आभाळ झटकून सारी मरगळ !!

डॉ. श्रद्धा नाईक,
आबुधाबी, यु‌. ए. ई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.