“जीवनाचे शास्त्र”
अनुभवाच्या प्रयोगातुन सिध्द होत जगण्याचं शास्त्र…
एकाच अनुभवातील प्रत्येकाचे निष्कर्ष वेगळे मात्र…
लपंडाव सुख दुःखाचा सुरु असतो जीवनात…
लक्षात यायला हवे आयुष्य ह्या गणितात…
या गणिताचे नियमच निराळे असतात…
दोन अधिक दोन इथे कितीही होवु शकतात…
सहज सोडविता आले या गणिताचे सूत्र…
आपसुकच उलगडत जाते जीवनाचे चित्र…
स्वतःच स्वतःशी स्पर्धा असते या खेळात…
जिंकण हरणं हे तर फक्त आपल्याच हातात…
आपणच आपला सामना असतो बघायचा …
आनंद घेवुनी एकतर्फी असतो जिंकायचा …
वैशाली केतकर, नवीन पनवेल







Be First to Comment