मनांतील वादळे
चक्रीवादळाने मोठे ,
पहा घातले थैमान !
माथ्यात विचारांचे ,
समुद्रात तुफान !!
लाटा उसळल्या ,
पाण्याच्या सागरी !
विचारांच्या मनांत ,
आक्रोश च पदरी !!
बेभान सुटला वारा ,
तांडव आकाशी !
शंकेचा वाहे अंतरी ,
परिणाम विनाशी !!
पाउस कोसळला ,
बाहेर टपोरे थेंब !
डोक्यात प्रश्नांचा ,
सगळे च ओले चिंब !!
किनारा सोडला ,
रत्नाकर उधाणला !
आसवांचा बांध ,
डोळ्यांतून ओसांडला !!
खवळलेले हृदय ,
आणि महासागर !
उध्वस्त करी जीवन ,
मनुष्य लाचार पामर !!
©® मानसी म्हसकर
सुरत गुजरात







Be First to Comment