माथेरान
गाडी चालली डोंगरा वरी
रानमाळ सभोवताली
पक्षी गातात गोड गाणी
करीत साथ ही नवी न्यारी..
वाट असे ही छान वळणाची लालचुटुक अशा मातीची
साथ घोड्यांच्या टापांची
खुणावते शिळ पक्षांची…
माथ्यावरी हवा थंडगार
पळवीते सारा क्षीण तडीपार समवेत असेल सारा परिवार
मौजेस नाही राहणार परावार…
पाहुनी मर्कट चाळे
अनुभवून पक्ष्यांचे गाणे
लयबद्ध घोड्यांच्या ह्या टापा दाखवितात निसर्गाच्या वाटा..
साठऊनी आनंद मनात सारा विसरण्यास भार कामाचा सारा फिरुनी तयार हाकण्यास संसाराचा हा रोजचाच गाडा…
मारून टाच घोड्यावरती
विसावूनी दस्तुरी नाक्यावरती
धरुनी वाट नेरळाची
गाडी चालली वाट परतीची
गाडी चालली वाट परतीची….
मिलिन्द मोघे, पनवेल







Be First to Comment