Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्यकट्टा : छत्रपती संभाजी महाराज

श्री.नंदकुमार विठोबा मरवडे यांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम व जीवनचरित्र विषद करणारी स्वरचित कविता

छत्रपती संभाजी महाराज

निधडी छाती जयाची
कणखरपणे मुघलांशी लढला
असा मर्द मराठा माझा
शंभू राजा होऊन गेला …….१

शिवरायांचा शूर पुत्र तो
जिजाऊंचा जणू लाडका लेकच तो
अखंड मराठा साम्राज्याचा जणू
शिवरायांनंतर तारणहारच होता तो …..२

नाही टाप लागली कुणाची
त्याच्या नजरेला नजर देण्याची
नाही हिम्मत केली कुणी
त्याला सामोरा जायची ……….३

प्रखर धर्म अभिमानी राजा
साहित्याचा प्रचंड होता भोक्ता
प्राण कंठाशी आला तरी
धर्मासाठी प्राणपणाने लढला होता …..४

पाहता निधडे शौर्य तुमचे
म्रुत्यूही नतमस्तक होऊनी राहिला
मराठी साम्राज्य रक्षणासाठी
माझा शंभूराजा अजरामर झाला …..५

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.