ईश्वर
ईश्वरा पुढे जुळती कर माझे. |
आई ,
तुझ्या पुढे झुकती शीर माझे. ||
ईश्वर, प्राण भरतो ह्या देहात.|
आई,
तान्हुल्या साठी झ्टते दिन रात.||
प्रारब्ध भाळी, लिहितो तो ईश्वर..|
आई,
संस्कारांतून करते, सक्षम माझे कर..||
ईश्वर , सकल जनाचा तारक, अन्नदाता..|
आई,
बाळाच्या पोषणासाठी, माता अन् पिता..||
ईश्वराची कृपा होताच,देतो मागेल ते.|
आई,
अंतःकरणातून ,सदा आशीर्वाद च देते..|l
सौ. कल्पना आशिष कुलकर्णी, आदई







Be First to Comment