अक्षय तृतीया
शुद्ध वैशाख मासी
सण येतो तृतीयेचा
सोनं करा मुहुर्ताचे
संकल्प तो नाविन्याचा
तप्त वणवा वैशाखी
कंठी कोरड पडते
जलकुंभ दानातुनी
तहानेली पाणी पिते
विष्णू पुजावा या दिनी
अविनाशी करु दान
पुण्य प्रारब्धी जोडोनी
अर्चकांसी द्यावा मान
अक्षय तृतीया दिनी
परशुराम हा जन्मला
पितरांच्या श्राद्धातुनी
पूर्वज ही तो निमाला
चैत्रगौर ती चालली
कुंकवाने ओटी भरा
लेक सासरी निघाली
आंबेडाळ पन्हे करा
छत्री पंखा जलकुंभ
मुक्त द्यावे यथाशक्ति
पुण्यसंचय करावा
संकटात तोचि तारी
लक्ष्मीकृपा सदा राहो
उद्योग दे धनवृद्धी
जीवनात सर्वां मिळो
अक्षय सुखसमृद्धी
सौ. स्वाती लेले, नवीन पनवेल







Be First to Comment