भ्रम
वाटलं होतं कधीतरी
गाऊ सुरात सूर मिसळूनी
विसरूनच गेले
मी खालचा सा तर तू वरचा नि
वाटलं होतं कधीतरी
चालू घालून हातात हात
विसरूनच गेले
मी मंद झुळूक आणि तू तर झंझावात
वाटलं होतं कधीतरी
जुळेल माझ्या वेगाशी तुझा वेग
विसरूनच गेले
मी हलकीशी लाट तर तुझा
तुफानाचा आवेग
वाटलं होतं कधीतरी
जाईल मिसळून रंगात रंग
विसरूनच गेले
तुझे नि माझे अगदीच वेगळे भावतरंग
अगदीच वेगळे भावतरंग.
सौ जयश्री ताम्हनकर, नवीन पनवेल







Be First to Comment