विचारधारा-९ *दृष्टीकोन*
दृष्टीकोनाचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन प्रकार असतात. मग ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या उक्तीची पूर्तता जाणवते.
दृष्टीकोनाचे महत्त्व की, सकारात्मक दृष्टीकोन कार्यास सुफलता देतो. तसेच नकारात्मक दृष्टीकोनही कधी कधी योग्य फल देतो. फक्त दृष्टीकोनामागील हेतू हा स्वच्छ, सरळ व प्रामाणिक असला पाहिजे.
उदाहरण की, स्त्रीला आजही काही ठिकाणी दुय्यम दर्जा, अबला म्हणून दृष्टीकोन ठेवून वागविले जाते. पण ही स्त्री पुरुषाप्रमाणे हाडा-मांसाचा आधी एक माणूस आहे. त्यामुळे माणुसकी या दृष्टीकोनाने पाहिल्यास तीही पुरुषांप्रमाणेच समान अधिकार-हक्कांस पात्र ठरते.
चुकीचा दृष्टीकोन ज्याला आपण गैरसमज म्हणतो तो बहुतेकदा जीवन उद्ध्वस्त करतो.
म्हणून अशा वेळी अवांतर वाचन व चांगले संस्कार हेच आपला दृष्टीकोन चांगला ठेवू शकतात. जसे अनुभव हा माणसाला शिकवत असतो, त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाचनही मनुष्याला दृष्टीकोन चांगला ठेवण्यास नकळतपणे त्यावर संस्कारच करीत असते.
सद्विचार-सदाचार ही दोन दृष्टीकोनाची प्यादी;
जीवनास कलाटणी देऊनी जोडी सुसंस्कारीत नाती…
✍️लेखिका✍️
श्वेता जोशी., नवीन पनवेल







Be First to Comment