Press "Enter" to skip to content

आनंद

आनंद

आयुष्य आनंदाने भरले आहे
कसा आनंद शोधायचा हे आपण ठरवायचय
नात्यात आनंद,प्रेमात आनंद
मैत्रीत आनंद, आपुलकीत आनंद
मनात आनंद,सृष्टीत आनंद
निःस्वार्थात तर.परमोच्च आनंद

बकुळीच्या फुलात आनंद,चाफ्याच्या रंगगंधात आनंद, कळीत आनंद,उमललेल्या फुलात आनंद
ईश्वरचरणी वाहिलेल्या फुलात आनंद
तर निर्माल्यातही आनंद
काट्या दगडातून खळखळणार्या नदीत आनंद
दाट वृक्षाच्या थंडगार छायेतही आनंद
सागराच्या लाटांमधेही आनंद
डोंगरावरून कोसळणार्या धबधब्यातही आनंद
तळपत्या तेजस्वी सूर्यातही आनंद
रात्रीच्या चंद्रतारकांच्या मंद प्रकाशात आनंद
रातराणीच्या धुंद सुगंधातही आनंद
पारिजातकाच्या पवित्र गंधातही आनंद
गोड निरागस.बाळाच्या क्रिडेतही
दुःखात आनंदाची मिळते झलक
थोडे डोळसपणे पाहिले तर
प्रत्येक गोष्टीत आनंदच आनंद
आयुष्यात आनंदाने जगायचंय
की रडत कुढत हे ज्याच त्यानं ठरवायचं
पण नेहमी आनंदातच जगायचं
Be positive Be happy

नयना पेंढारकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.