साक्षात्कार
मित्र परिवारातील, आप्त स्वकीय
किती गेले सोडून,
रोज रोज श्रद्धांजली वाहून
धीर गेला खचून.
रामरक्षा म्हणून रामाला
साकडे झाले घालून.
वैद्यकीय शास्त्र ही थकले
प्रयोग करून करून.
कोरोना मात्र दिवसेंदिवस
राहीला बलशाली होऊन.
तरुणांना ही सोडत नाही
जातो सोबत घेऊन.
पहावत नाही देवा आता
मानवाची दशा.
काहीतरी कर पण घालव
ही माणसाची दुर्दैवी दशा.
हतबल होतो माणूस
तेव्हा घेतोस तू अवतार,
कुठलाही अवतार घेऊन
घडवना रे चमत्कार.
संकटावर या मात करण्यास
केवळ तुझाच साक्षात्कार,
केवळ तुझाच साक्षात्कार.
सौ. आशा व्यास, नवीन पनवेल







Be First to Comment