Press "Enter" to skip to content

“भाव विश्व”

“भाव विश्व”

आजकाल मी विचार करायचे सोडून दिले आहे
असणारा प्रत्येक क्षण माझ्याबरोबर जगतो आहे

कालपर्यंत मी तुझ्यात गुंतून पडलो होतो
आज माझ्या प्रत्येक क्षणाची तू साक्षीदार आहे

असलेल्या नसलेल्या आठवणींनी हृदयात तळ गाठला
श्वासागणिक तुझ्या असण्याचा आनंद आहे मनाला

आज मला तू नव्याने गवसली आहे
भूत-भविष्याची चिंता कायमची मिटली आहे

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.