सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
माझा जन्म आगरी कोळी कुटुंबात झाला असल्यामुळे “जात-धर्म-कुळ” याचा विचार देखील लहानपणापासून कधीच आला नाही. घरातही तशी शिकवण नव्हती. पण जशी जशी मोठी होत गेले… तसं तसं आपल्या समाजातील रुढी परंपरा यांच्याशी अवगत होत गेले…
आगरी कोळी समाज मुळात “मच्छिमारी आणि भात शेती” निगडीत व्यवसायात उदरनिर्वाह करत. सिडको ने आपल्या आगरी कोळीच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेतल्या… पण त्या जमिनीच्या बदल्यात मोबदला “स्व. दि. बा. पाटील” यांच्या अथक परिश्रमानंतर प्लॉट किंवा पैसे स्वरुपात प्राप्त झाला.
पण आपण काय करत आहोत…? आलेल्या संधीचा वापर कसा करतोय…? याचा जराही विचार करतो का…? याचा विचार देखील केला आहे का ? आपल्याकडील रक्कम आपण महागड्या गाड्या, सोने, मोठी घरे, दारु , पार्टी, हॉटेलचं जेवण यामध्ये बऱ्याच पैकी घालवतो.
नुकतीच मी एक व्हायरल व्हाट्सअँप पोस्ट वाचली… वैद्यकीय फीस (Private Medical College) जास्त असल्यामुळे कित्येक विद्यार्थी डॉक्टर्स नाही होऊ शकले.
त्या फीस पेक्षा आपल्याकडे करोडोच्या गाड्या, दागिने आहेत. तेच पैसे आपण शिक्षणांवर खर्च करा. आताच्या ‘कोविड’च्या संकटात आपण बघितले की, खुप दुर्दैवी परिस्थिती आपल्यावर आली.. तरुण धडधाकट मंडळी देखील या कोविड मुळे गमावलेली आहेत. पण आपण शैक्षणिक दृष्ट्या सबळ असतो तर नक्कीच आपण यावर अधिक प्रभावी पणे मात केली असती.
आपल्याला का वाटत नाही…? “आपल्या प्रत्येकांच्या घरांतून एकजण डॉक्टर फार्मासिस्ट किंवा वैदयकिय क्षेत्रातील असावा.”
आणि अशी कितीही संकटे आलीत तरी ती आपण आई एकविरेंच्या कृपेने त्यावर नक्कीच मात करुच ….!
आगरी कोळी समाजाचा वारसा आपण फक्त संस्कृतीने नव्हेच, तर शिक्षण स्वरूपात देखील आपण जतन करुच हीच आई एकविरेकडे प्रार्थना…!
शब्दांकन:
सौ. सीमा सुभाष पाटील
(अध्यक्षा, केमिस्ट असोसिएशन उलवे)






Be First to Comment