Press "Enter" to skip to content

विचारधारा-८

विचारधारा-८ *स्वभाव*

स्वतःचा असलेला भाव तो स्वभाव. बाह्य व आंतरिक भाव यानुसार स्वभाव बनतो. बाहेरून सरळ, साधेपणाचा भाव असलेली व्यक्ती आंतरिक भावाने तशी असेलच असे नाही. पण जो बाह्य व आंतरिक समता ठेवतो तो खरा खुल्या स्वभावाचा असे म्हटले जाते.
बाह्य भावापेक्षा आंतरिक भाव महत्त्वाचा व तो केवळ प्रारब्ध-पूर्वसंचित कर्मांवर अवलंबून असतो.
स्वभावो दुरतिक्रमः म्हणजे मूळ स्वभाव कधी बदलत नाही. कारण मनाच्या आतील गाभ्यात वसलेला असतो.
अशा या स्वभावाला औषध काय? तर भगवंताचे नामस्मरण हा एकमेव उपाय. त्या भगवंताला शरण जाऊन नित्य त्याचे स्मरण की, कर्ता-करविता तोच आहे, अशी जाणीव ठेवणे. त्यामुळे हळूहळू का होईना मूळ स्वभावात चांगले बदल घडतात.
ध्यानी-मनी नाम जिथे तिथेच नित्य वसे राम;
कुस्वभावास मुरड घालणे हेच त्या भगवंताचे काम…
अशा रीतीने एखाद्याच्या स्वभावाला नांवे ठेवण्यापेक्षा स्वतःच्या नांवे ठेवण्याचे लक्षणाकडे बघावे व सुधारणा करावी. असे चांगले विचारभाव हे केवळ नामस्मरणाच्या औषधाने उत्पन्न होतात.
तेव्हा हे मानवा,
नामस्मरणाच्या औषधाने जाणून घेई रे स्वतःच्या स्वभावातील त्रुटी;
तेव्हाच सुधारणा होऊन रे, होतील या जीवा-शिवाच्या गाठीभेटी…

✍️लेखिका✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.