Press "Enter" to skip to content

बहावा

बहावा

रणरणत्या उन्हात बहरूनी
आल्हाददायक हा होऊन उभा
बहावा म्हणू की सुवर्ण सोहळा
ग्रीष्मातला हा अमुल्य असा ठेवा

हळदफुलांची करूनी अरास
भंडारा हा जणू उधळत येई
वसुंधरेस रंगवूनी पिवळी
शृंगारून नव रूप तिला देई

सृष्टीचा मनमोहक नजराणा
मोहवसी नित्यच हर ऐकास
गंधित होऊन ,रंगवून जावे
माखुनी स्वतःला आमलतास

संगीता देशपांडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.