Press "Enter" to skip to content

स्मार्ट आजी …आजची

स्मार्ट आजी …आजची

डोळ्याला चष्मा,केसांचा पोनी
तिच्याजवळ असतो नेहमी

खणखणणारा भ्रमणध्वनी
सुप्रभात च्या मेसेजनी

होते आमची सकाळ
सुट्टीच्या दिवशी मात्र
ही लावते व्हिडीओ कॉल

भेट नाही झाली तरी
वाटतं पहावं दुरून
नातवंडांच्या बोबड्या बोलानी
मन येते भरून

सकाळी ऑन लाईन योगा
संध्याकाळी भजन
आजीचं परफेक्ट असतं
वेळेचं नियोजन.

कधी घालते ड्रेस,कधी नेसते साडी
भेटली की हमखास देते ठसठशीत
खोबऱ्याची वडी.

सौ. संध्या करंदीकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.