वसंत
कोकिळकंठी मधुर सुरांनी
नटला सजला वसंत हा ।
पांघरून हिरवाई येथे
मोहरला तो वसंत हा ॥ १॥
नवा साज हा लेवुन येई
चैत्रपालवी फुलवुन जाई ।
नवेच गाणे, नवे उखाणे
घेवुन येई वसंत हा ॥ २ ॥
वैशाखाचा वणवा असुनी
आम्ररसाचा असे गोडवा ।
हाच गोडवा ओठातच या
ठेवुनी जाई वसंत हा ॥ ३ ॥
शुष्क कोरड्या शिशिरानंतर
फुलवुन टाके स्रुष्टी सारी ।
वळवाच्याही सरीसरीतुन
झरझरून जाई वसंत हा ॥ ४ ॥
केदार जोशी, पनवेल







Be First to Comment