पांढरे केस..हिरवे मन…
काळ धावतो,शरीर थकते,केस झाले रूपेरी ,
चेहर्यावर सुरकुत्या,
कपाळी आठ्या,
केली पार पंचाहत्तरी……
पाठ दुखते,गुढगे सुजतात,
कंबरेला आला बांक
तरी रोज धडाडीने
करते मॅार्निंग वॅाक…..
हात कांपतात, मान दुखते,
आहे संधिवात ,
तरी पण करते आवडीने
खमंग मसालेभात…..
कॅटरॅक झाले , आपरेशन केले,
घालते आयड्रॅाप..
ह्विडिओ गेम्स खेळत खेळत,
खाते. “स्ट्रॅाबेरी लॅालीपॅाप’…..
दांत दुखतात, अर्धे डेंचर ,
करते, ‘शितली” प्राणायाम ,
संक्रांतीला कडक लाडू ,
खाते आवडीने छान…..
नाटकं बघते , सीनेमे पाहते ,
हसते मनमुराद ,
नातवंडं म्हणतात ,
आमची आजी आहे ‘बिनधास्त “……
काळ कांही थांबत नाही,
वयं वाढायचं राहात नाही ,
मग आपण कां थांबायचं..?
मजेत आयुष्य जगायचं……
“ मस्त रहा, स्वस्थ रहा ‘
मंत्र हा जपायचा.. ,
शरीर होते म्हातारे..
पण मन…….?
त्याला नाही थार ,
ते तर असते नेहमी ,
“ ताजे ‘ “टवटवित ‘
अन् “हिरवेगार .‘…..
विजया करंडे
प्रिन्सटन.., अमेरिका







Be First to Comment