तू ही लढ
लढली सावित्री
हक्क शिक्षणाचा
दिला मिळवून
हात जोतिबाचा
शिकून शहाणी
झाली नारी आज
आले बळ पंखी
जागला आवाज
सोडून पिंजरा
गगनी भरारी
पंख पसरून
उंच घेते नारी
नाही कशातही
कमी आता मुली
तुझ्यासाठी पहा
सर्व क्षेत्रे खुली
नको कारभार
तो नावापुरता
घे निर्णय तुझे
येई निपुणता
मंगळ यानाची
धुरा सांभाळली
नकोच ती भीती
त्या पत्रिकेतली
मुलगी मरते
अजूनही पोटी
तू ही लढ, नको
प्रतिष्ठा ती खोटी
निर्भया नकोच
नुसत्या नावाची
अन्यायाविरुद्ध
जिद्द लढण्याची
अगतिकतेची
नकोच लाचारी
दुर्गा जागवित
ठेच दुराचारी
तू ही लढ जरा
त्या बहिणींसाठी
आधार बनून
दुबळ्यांची काठी
सौ. विजया चिंचोळी
खारघर, नवी मुंबई







Be First to Comment