तिसरा पंच भाग क्र. १
मे महिन्याची दुपार होती.. दोन मित्र शेतात काम आटोपून दुपारच्या भोजनासाठी शेतातील झाडाखाली येऊन थांबले होते…
मित्रा, आयुष्यभर इतरांसाठी मी किती कष्ट केले, संसाराचे चटके खाल्ले तरी कोणाला त्याची पर्वा नाही.. किती किती करतो इतरांसाठी पण कोणालाच त्याची जाणीवच नाही… खर सांगतो मित्रा कृतज्ञता हरवली रे…
रणरणत्या उन्हात त्यांना सावली देणाऱ्या झाडाची दोन पाने अलगद गळून पडली.
गावाच्या बाहेर लांबवर पसरलेला रस्ता होता.. त्यावर एक बैलगाडी झोक्यात चालत होती.. त्या गाडीच्या खाली सावलीत एक कुत्रा चालत होता.. दुडु दुडु चालणाऱ्या त्या बैलगाडीत बसलेला गाडीवान आणि गाडीच्या सावलीत चालणारे श्वान, दोघेही आपल्याच तोऱ्यात म्हणत होते की, गाडी पुढे जातेय माझ्यामुळेच..
पण खरी गाडी ओढणारा बैल मुकाट्याने मान डोलावीत गाडी ओढत होता..
शेखर अंबेकर, आदई..







Be First to Comment