Press "Enter" to skip to content

ऐसा महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिन
ऐसा महाराष्ट्र माझा

ऐसा महाराष्ट्र माझा
अवघ्या देशाचा कल्याणकारी राजा.
कष्टकऱ्यांना घेऊनी खांद्यावरती देई आशेचे अमृत.
अन्यायाचा प्रतिकार करीत संजीवनी करी जागृत. शालीनता ,सदाचरण जयाठाई अभंग
ऐसा महाराष्ट्र माझा.

सन्मागाचा झेंडा फडकवला अवघ्या देशाचा राजा , शांती ,बलिदान, न्यायाचे प्रतीक माझा महाराष्ट्र असे . सत्यम ,शिवम सुंदर तेथे महान रूप अंतरी वसे.

ज्ञान, विज्ञान ,सन्मानाने गौरवलेला हा मराठी देश समता, ममता ,बंधुत्वाचा देई सदा संदेश . नैतिक सामाजिक सहकाऱ यांची सर्वस्वी समृद्धी. शौर्य ,धैर्य, औदार्य सह जोडली असे सिद्धी .
सत्य ,एकता ,स्वातंत्र्य ही वैविध्य रुपी शान . सात्विक,अध्यात्मिक, सामाजिक , संतभूमी चे अधिष्ठान .
आचार-विचार व उच्चारांचे सौंदर्यवान वरदान. संपन्नतेने गुणगौरवलेले राष्ट्र हे आमचे महान .

निसर्गरम्य हिरवाईने नटली इथली वसुंधरा. स्वच्छ ,सुंदर ,सामर्थ्यवान अशा महाराष्ट्रास मानाचा मुजरा. ऐसा महाराष्ट्र माझा या देशाचा कल्याणकारी राजा. सन्मार्गाचा झेंडा रोविला साऱ्या देशाचा राजा. ऐसा महाराष्ट्र माझा…

पूर्णिमा शिंदे मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.